सावधान, महाराष्ट्रात उष्णतेची लाट!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचे अावाहन वैद्यकीय सूत्रांनी केले आहे. जनावरांसह पशू-पक्ष्यांनाही अन्न-पाण्याची जाग्यावर व्यवस्था करावी, असे अावाहन करण्यात अाले आहे. पिकांची होरपळ वाढल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.

रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राजस्थानमधील चुरू येथे देशभरातील उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणीही तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक होते. मध्य महाराष्ट्रात जळगाव, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी तापमान नोंदले गेले आहे. राज्यात वाढलेला उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

रविवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.४, नगर ४३.७, जळगाव ४४.४, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४४.२, नाशिक ३९.६, सांगली ३९.८, सातारा ४०.३, सोलापूर ४२.४, मुंबई (सांतक्रूझ) ३३.२, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.१, औरंगाबाद ४१.६, परभणी ४४.३, नांदेड ४४.०, अकोला ४५.०, अमरावती ४४.४, बुलडाणा ४२.५, चंद्रपूर ४५.२, गोंदिया ४२.०, नागपूर ४४.३, वर्धा ४५.०, यवतमाळ ४०.५.

अंदमानात कमी दाब क्षेत्राची निर्मिती
अंदमान समुद्र आणि परिसरावर रविवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. या परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे अंदमान निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, मंगळवारपर्यंत (ता. १) पश्‍चिम बंगाल, आेडिशा, सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water shortage agriculture summer temperature increase