Ahilyanagar Crime:'कोतूळ येथून गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त'; १२ जणांवर गुन्हे, पाेलिसांची काैतुकास्पद कामगिरी
Police performance : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने कोतूळ येथील नाचणठाव रोडवर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून गुटखा जप्त केला. सोहेब सावीद काजी, शाहीद हुसेन लतीफ पटेल या दोघांबरोबरच इतर दहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Kotul police display seized gutkha stock worth ₹1 crore; major step in curbing illegal tobacco salesSakal
अकोले : प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने आज कोतूळ येथे छापा टाकून गुटखा विक्री करणारी टोळी पकडली. कारवाईत गुटखा व वाहनांसह एक कोटी एक लाख ७४ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.