अगोदर सदस्य व्हा, मग आरक्षणाचे पाहू; अकोले तालुक्यात शंभर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

शांताराम काळे
Tuesday, 15 December 2020

अगोदर सदस्य व्हा मग आरक्षणाचे पाहू. सरकारी फतवा निघाल्याने सरपंच उमेदवार आवाक झाले आहेत.

अकोले (अहमदनगर) : अगोदर सदस्य व्हा मग आरक्षणाचे पाहू. सरकारी फतवा निघाल्याने सरपंच उमेदवार आवाक झाले आहेत. अकोले तहसीलदारांनी सरपं आरक्षणाबाबत १६ डिसेंबरला अकोले पंचायत समिती सभागृहामध्ये सभा बोलावली होती.

मात्र ल. स. माळी, उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ११ डिसेंबरला लेखी पात्र पाठवून हे आरक्षण १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलले आहे. त्यामुळे ही सभा रद्द करून १५ जानेवारीनंतर होणार आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी याबाबतची माहिती सांगितले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आदिवासी भागातील शंभर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आंबित, अंभोळ, अंबितखिंड, आंबेवगन, बारी, बाभुळवंडी, भंडारदरा, भोळेवाडी, ब्राहामानवाडा, चिचोंडी, चितळवेढे, चंदगीरवाडी, चिंचवणे, दिगंबर, देवगाव, धमानवन, धामणगाव पाट, एकदरे, घाटघर, गुहिरे, घोडसरवाडी, घोटी, गोंदूशी, जहागीरदार वाडी, जामगाव, जायनावादी, कोदणी, कोहंडी, कातळपावर, केळुंगान, कौठवाडी, कोलतेंभे, कुमशेत, खडकी खुर्द, कोकणवाडी, केळी रुम्हणवाडी, खिरविरे, कोंभाळणे, कोतुळ, कोहने, ओतूर, केळी कोतुळ, करंदी, खुंटेवाडी, लाडगाव, लव्हाळी ओतूर, मान्हेरे, मुरशेत, मालेगाव, मुतखेल, मवेशी, म्हाळुंगी, मुथाळने, म्हाळादेवी, निळवंडे, निब्रळ, नाचणठाव, पिंपळगाव नकवींद, पिंपरकाने, पेंडशेत, पांजरे, पाचनई, पाचपट्टावाडी, पेढेवाडी, पिंपळदार वाडी, पाडोशी, पाडाळणे, पैठण, पळसुंदे, रतनवाडी, रनद बुद्रुक, राजूर, शेणीत खुर्द, शिंगणवाडी, साम्रद, शेंडी, शेलविहीर, सावरकुठे, शिरपुंजे, साकीरवाडी, सांगवी, सावरगाव पाट, समशेरपूर, शेल्ड, शेरणखेल, सिसवद, सोमलवाडी, शिळवंडी, सातेवाडी, टिटवी, तेरुंगण, तिरडी, टाहाकारी, तळे, उडदवणे, विठे, वारुंघुशी, वाकी, वाजूळशेत, पांगरी या गावाचा समावेश आहे. 

राजूर, कोतुळ, समशेरपूर, शेंडी या प्रमुख गावांचा यात समावेश आहे. या आदेशामुळे पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेने नाराजी व्यक्त करत सरकार व प्रशासन सोयीने आरक्षण करून ग्रामविकासाला अडथळा निर्माण करत असल्याचे सचिव पांडुरंग भांगरे म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 One hundred gram panchayat elections in Akole taluka