esakal | महसुलमंत्र्यांच्या थोरात कारखान्याकडून 100 रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट बॅंकेत वर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

100 Rs per deposit from Thorat Sugar Factory in Sangamner taluka

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सन 2019- 2020 मध्ये गळीतास आलेल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना, दिपावलीनिमित्त 100 रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट बॅंकेत वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांनी दिली.

महसुलमंत्र्यांच्या थोरात कारखान्याकडून 100 रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट बॅंकेत वर्ग

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सन 2019- 2020 मध्ये गळीतास आलेल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना, दिपावलीनिमित्त 100 रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट बॅंकेत वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांनी दिली. 

या कारखान्याने उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. तसेच एक रकमी एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे. 2019-2020 मध्ये गळीतास आलेल्या उसाला यापुर्वी 2 हजार 530 रुपये प्रतिटन भाव दिला आहे.

दिपावलीनिमित्त आणखी 100 रुपये प्रतिटन भाव दिल्याने, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 2 हजार 630 रुपये भाव मिळाला. कोरोना संकट व आर्थिक महामंदी असताना दिवाळीनिमित्त कामगारांना 20 टक्के बोनसचे 5 कोटी 38 लाख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान म्हणून 2 कोटी 68 लाख रुपये आणि शेतकऱ्यांच्या ठेवीचे 1 कोटी 48 लाख रुपये देण्यात आले. तसेच कारखान्याच्या सर्व सभासदांना 15 किलो मोफत साखर वाटप सुरु आहे. सभासदांच्या ठेवी वरील व्याज ही बॅंकेत वर्ग करण्यात आले आहे. 

ऊस पेमेंट 2 कोटी 51 लाख, ठेवींवरील व्याज 2 कोटी आणि बोनस व सानुग्रह अनुदान 8 कोटी असे एकूण, 12 कोटी 51 लाख रुपये दिवाळीनिमित्त बाजारात येणार आहेत. यामुळे तालुक्‍यातील शेतकरी, कामगार, व्यापारी वर्ग व बाजारपेठेत आनंदाचे वातावरण आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image