अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह! पवार कुटुंबीय करणार कन्यादान | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pawar family

अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह! पवार कुटुंबीय करणार कन्यादान

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (जि.अहमदनगर) : अवघ्या 1 रुपयांत 'हा' शाही विवाहसोहळा आमदार नीलेश लंके लावणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे कन्यादान करणार आहेत, अशी माहिती आमदार लंके यांनी दिली.

मंत्र्यांचीही असेल हजेरी

कोरोना महामारीदरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. मुला-मुलीच्या लग्नात अनेक वधूवर-पिता कर्जबाजारी होतात, ही बाब लक्षात घेऊन, अनेक गोरगरीब व गरजूंना आधार मिळावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या सामुदायिक विवाहसोहळ्यास राज्यातील अनेक मंत्रिगण हजेरी लावणार आहेत. कोरोनामुळे (coronavirus) अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यांच्यापुढे मुलींच्या लग्नाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठान धावून आले आहे. तब्बल एकशे एक विवाह शाही पद्धतीने अवघ्या एका रुपयात लावले जाणार आहेत. 'हा' शाही विवाहसोहळा १० मार्चला होणार आहे. यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांचा विवाह शाही पद्धतीने लावण्यात येणार आहे.

हेही वाचा: खासदार नको; तुम्ही आर. आर. आबा व्हा

मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे

गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटात अनेक गोरगरीब गरजू शेतकरी व पालकांना, मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना पर्याय म्हणून अवघ्या एक रुपयात आमदार नीलेश लंके यांनी तालुक्यात सामुदायिक विवाहसोहळा आयोजित केला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने संसारोपयोगी साहित्यसुद्धा देण्यात येणार आहे. पारनेर येथील बाजार समितीच्या आवारात एका प्रांगणात हा विवाहसोहळा आयोजित केला आहे.

हेही वाचा: Ahmednagar Fire : महावितरणची भूमिका असहकाराचीच

loading image
go to top