वृद्धेश्‍वर कारखान्यासाठी 120 उमेदवारी अर्ज

राजेंद्र सावंत
Thursday, 14 January 2021

वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. बुधवारी सर्वाधिक 58 अर्ज दाखल झाले.

पाथर्डी (अहमदनगर) : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागांसाठी 120 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सत्ताधाऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जांचीच संख्या अधिक आहे. विरोधी गटाने अर्ज दाखल केले असले, तरी पाथर्डी गट, महिला प्रतिनिधी व ब वर्ग संस्था मतदारसंघात राजळे गटाचेच अर्ज आले आहेत. त्यामुळे राजळे गटाच्या काही जागा बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. बुधवारी सर्वाधिक 58 अर्ज दाखल झाले. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आमदार मोनिका राजळे यांनी सुरू केला आहे. दाखल अर्जांची गुरुवारी छाननी होणार आहे. अर्जमाघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 120 nominations have been filed for 19 seats of Shri Vriddheshwar Sahakari Sugar Factory

Tags
टॉपिकस
Topic Tags: