
अहिल्यानगर: जिल्हा परिषदेने आज केंद्रप्रमुखांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती दिली. यात प्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांच्यासह सातजणांचा समावेश आहे. त्यांना नेवासे तालुका मिळाला. सर्वांना समुपदेशनाने पदोन्नत्या देण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.