अबब... तब्बल 97 गावातील 127 पाणी नमुने दूषीत

दौलत झावरे
Thursday, 23 July 2020

ज्या गावांतील पाणी दूषित आढळतील, त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाणीनमुन्यांची संख्या वाढत आहे.

नगर  : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाण्याचे 1846 नमुने जून महिन्यात तपासण्यात आले. त्यांत 97 गावांतील 127 नमुने दूषित आढळून आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. ज्या गावांतील पाणी दूषित आढळतील, त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाणीनमुन्यांची संख्या वाढत आहे. जून महिन्यात तपासण्यात आलेल्या 1846 पाणीनमुन्यांपैकी 127 नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 6.88 गेली आहे.

हेही वाचा ः म्हणून नगर जिल्हा परिषदमधील ग्रामसेवक समाधानी

नगर तालुक्‍यात सर्वाधिक पाणीनमुने दूषित आढळले असून, त्याखालोखाल जामखेड तालुक्‍याचा क्रमांक आहे. 

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे 
नगर ः
सारोळा, रुईछत्तिशी, हातवळण, मठपिंप्री, सांडवे, दशमी गव्हाण, देवगाव, टाकळी काझी, हिंगणगाव, आगडगाव, रतडगाव, जांब, माथणी, रांजणी, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, मेहेकरी, सोनेवाडी, भातोडी, पारेवाडी, टाकळी खातगाव, निमगाव वाघा. 
अकोले ः शेलद, चैतन्यपूर, काळेवाडी, ब्राह्मणवाडा, मुथाळणे, सावरगाव पाट. जामखेड ः जवळे, खुंटेवाडी, राजेवाडी, पोतेवाडी, मतेवाडी, नान्नज, गुरेवाडी, नाणेवाडी, कडभनवाडी, कोल्हेवाडी. कर्जत ः पाटेवाडी. कोपरगाव ः आपेगाव, सोनारी, संवत्सर. पारनेर ः वेसदरे, गारगुंडी, पिंप्री पठार, गांजीभोयरे, निघोज, पठारवाडी, वडनेर बुद्रुक, पाडळी तुर्क, ढवळपुरी, जामगाव, वडुले, मांबेवाडी. पाथर्डी ः खर्डे, दैत्यनांदूर, चितळवाडी, जोगेवाडी, चिंचपूर पांगूळ, टाकळी मानूर, तिसगाव, जवळवाडी, चिचोंडी, वैजूबाभूळगाव. शेवगाव ः दहिफळ जुने, शहर टाकळी, सुलतानपूर बुद्रुक, मुर्शतपूर, एरंडगाव समुद्र. राहाता ः रांजणगाव खुर्द, जळगाव, पुणतांबे. राहुरी ः वांबोरी, उंबरे, म्हैसगाव, चितपाव, गडदे आखाडा, वाकडेवाडी, ताहाराबाद, मुसळवाडी. संगमनेर ः आभाळवाडी, मुंजेवाडी, पिंपळगाव देपा, साकूर, हिवरगाव पठार, कोळवाडा, डिग्रस. श्रीगोंदे ः बेलवंडी बुद्रुक, वडगाव म्हसे, रायगव्हाण, एरंडोली. श्रीरामपूर ः बेलापूर बुद्रुक, कडीत बुद्रुक, निपाणी वडगाव. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 127 Water samples contaminated