Ahmednagar Corona Update : जिल्हा परिषदेत १४४ कर्मचारी बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona Positive
अहमदनगर : जिल्हा परिषदेत १४४ कर्मचारी बाधित

अहमदनगर : जिल्हा परिषदेत १४४ कर्मचारी बाधित

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह पंचायत समित्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन केले जात असले, तरी कोरोना या सर्व कार्यालयांमध्ये शिरकाव केलेला आहे. शुक्रवारपर्यंत एकूण १४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ३३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे एकूण आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: जळगाव : गिरणा परिक्रमेची जलशक्ती मंत्रालयाकडून दखल

त्याखालोखाल पाणी पुरवठा विभागात बाधितांची संख्या आढळून आलेली आहे. या विभागात एकूण सात कर्मचारी बाधित आढळलेले आहेत. जिल्हा परिषदेतील एकूण सतरा विभागापैकी ग्रामपंचायत विभाग, लघुपाटबंधारे विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, मग्रोरोहयो कक्ष, जिल्हा ग्रामीणविकास यंत्रणा या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केलेला नाही. चौदा पंचायत समित्यांपैकी १३ पंचायत समित्यांमध्ये आज अखेर १११ कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

नगर पंचायत समितीत जास्त रुग्ण

चौदा पंचायत समित्यांमध्ये नगर पंचायत समितीत कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नगर पंचायतीत आजअखेर एकूण २२ जण बाधित आढळून आलेले आहेत. त्याखालोखाल जामखेड पंचायत समितीत २१ बाधित आढळून आलेले आहेत. तिसऱ्या कर्मचाऱ्यांचे रुग्ण संगमनेर नगर पंचायतीत आहेत. संगमनेरमध्ये १६ कर्मचार बाधित आहेत. श्रीगोंदा पंचायत समितीत अद्यापही कोरोनाने शिरकाव केलेला नाही.

हेही वाचा: Uttarakhand Election : मंत्री रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

जिल्हा परिषदेसह सर्वच पंचायत समित्यांमधील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. बाधित आढळून आलेल्या सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे.

-संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

आकडे बोलतात

  • आज आढळलेले बाधित२५

  • जिल्हा परिषदेतील एकूण बाधित ३३

  • चौदा पंचायत समित्यांमध्ये एकूण बाधित१११

  • आज अखेर एकूण बाधित१४४

Web Title: 144 Employees Covid19 Affected Zilla Parishad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top