

Ghodegaon Fire Incident: Firefighters Control Massive Flames After Heavy Losses
Sakal
सोनई : घोडेगाव (ता. नेवासे) येथील सचिन व सुजित सुभाष चोरडिया यांच्या मालकीच्या माता घोडेश्वरी फर्निचरच्या चार मजली दुकानाला आग लागली. ही आग बुधवारी (ता. १९) रात्री लागली होती. या आगीत अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, सहा अग्निशमन बंब व दोनशेहून अधिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तब्बल आठ तासांनंतर आग आटोक्यात आली. वीजपुरवठा यंत्रणेत शाॅर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.