विकास आराखड्याचे देणे- घेणेच नाही; प्रशिक्षणाला फक्त १५ झेडपी सदस्यांची उपस्थिती

दौलत झावरे
Saturday, 5 December 2020

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आमचा गाव आमचा विकास योजनेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षणाला (जीपीडीपी) अवघे 15 जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

अहमदनगर : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आमचा गाव आमचा विकास योजनेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षणाला (जीपीडीपी) अवघे 15 जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. 

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाच्या केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक गावातील गरजा ओळखून त्यांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करून त्यानुसार विकास आराखडा कसा तयार करावा, यासाठी प्रामुख्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशिनाथ दाते, सभापती सुनील गडाख, सभापती उमेश परहर, सभापती मीरा शेटे यांच्यासह नऊ सदस्य उपस्थिथ होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या प्रशिक्षण शिबिरात आमचा गाव आमचा विकास योजनेत विकास आराखडे तयार करताना गावातील गरजांनुसार प्राधान्या यादी तयार करावी, 15 व्या वित्त आयोगाचा 80 टक्के निधी हा ग्रामपंचायत पातळीवर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या गावातील गटांची गरजेनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करून त्यानुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Zilla Parishad members of Grampanchayat Development Plan training