
अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या तीनशे गाळ्यांमध्ये मोठा झोल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १६१ गाळेधारकांनी पोटभाडेकरू ठेवले असून, १३० गाळ्यांमध्ये परस्पर फेरबदल करण्यात आला असल्याची बाब महानगरपालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. त्याचबरोबर ६८२ गाळेधारकांनी २५ कोटी रुपयांचे भाडे थकविले आहे. त्यामुळे गाळेधारक मालामाल अन् मनपा कंगाल असे म्हणण्याची वेळी महानगरपालिका प्रशासनावर आली आहे. गाळेधारकांची ही मनमानी थांबविण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दहा पथके तयार करून सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.