
अहिल्यानगर: जिल्ह्यात १० लाख ५५ हजार कुटुंबांपैकी ४१ लाख ६५ हजार लाभार्थी आयुष्मान कार्डसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत.
उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढावेत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.