
अहिल्यानगर : केडगाव येथील बांधकाम व्यावसायिकाची प्लॉट खरेदीत १८ लाखांची फसवणूक झाली आहे. ही घटना डिसेंबर २०२३ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान केडगावातील भूषणनगर येथे घडली. सुरेश नामदेव लगड (वय ४३, रा. सुशांतनगर, सोनेवाडी रोड, केडगाव, अ. नगर) यांचे आदेश कन्स्ट्रक्शन नावाने फर्म असून ते प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधून ग्राहकास विक्री करतात.