Ahmednagar News : तीन दिवसांत १९६ अर्जांची विक्री; अहमदनगरसाठी १०७; तर शिर्डीत ८९ नेले अर्ज

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी (ता.२०) ९ जणांना २२ अर्ज घेतले. शिर्डी मतदार संघासाठी १२ व्यक्तींनी २३ अर्ज घेतले. अहमदनगर मतदार संघासाठी तीन दिवसांत १०७ अर्ज घेतले आहेत.
Ahmednagar lok sabha
Ahmednagar lok sabhaSakal

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी (ता.२०) ९ जणांना २२ अर्ज घेतले. शिर्डी मतदार संघासाठी १२ व्यक्तींनी २३ अर्ज घेतले. अहमदनगर मतदार संघासाठी तीन दिवसांत १०७ अर्ज घेतले आहेत.

एकही अर्ज दाखल झालेला नाही. शिर्डीसाठी आतापर्यंत ४८ इच्छुक उमेदवारांनी ८९ अर्ज घेतले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे.अहमदनगरसाठी शनिवारी (ता.२०) अर्ज घेतले इच्छुक उमेदवार याप्रमाणेः मच्छिंद्र गावडे (रा. मल्हारवाडी, ता. राहुरी)-४ अर्ज, भाऊसाहेब वाबळे (रा. दरेवाडी, ता. नगर)

- दोन अर्ज, दत्तात्रय वाघमोडे (साकत, ता. नगर)-एक, मदन सोनवणे (रा. मोरगव्हाण, नेवासे)- दोन तसेच धीरज बगाडे (रा. पाथर्डी) यांच्यासाठी एक, उमाशंकर यादव (रा. बोल्हेगाव, ता. नगर)-दोन, हनुमंत घावणे (रा. राक्षसवाडी, ता. कर्जत)- दोन, स्मिता बापूसाहेब तरटे (रा. श्रीगोंदे)-चार, शहाजी काकडे (ढोरले, ता. जामखेड)- चार अर्ज घेतले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मागील तीन दिवसांत आतापर्यंत ४८ इच्छुक उमेदवारांनी ८९ अर्ज घेतले आहेत. अर्ज घेणाऱ्या इच्छुकांची नावे याप्रमाणे ः सतीश पवार, संजय खामकर, बाळासाहेब भोसले, ॲड. सिध्दार्थ बोधक,

चंद्रकांत दोंदे, अभिजित पोटे, डॉ. जयंत गायकवाड, चंद्रकांत बागूल, चंद्राहार जगताप, ॲड. नितीन पोळ, प्रशांत निकम, किशोर वाघमारे, सुधाकर रोहम, राजेंद्र घायवट, शंकर भारस्कर, संदीप घनदाट, अशोक वाकचौरे, गोरक्ष बागूल, राजू कदम, रामचंद्र जाधव, सदाशिव लोखंडे, दिलीपराव गायकवाड, उत्कर्षा रूपवते,

विशाल कोळगे, योगेश जाधव, यशवंत म्हस्के, योहान साळवे, रवींद्र पारखे, संजय भालेराव, बबन गवळी, विश्वास माघाडे, विजयराव खाजेकर, गंगाधर कदम, अश्विनी दोंदे, नचिकेत खरात, विनोद अहिरे, नितीन उदमले, संतोष वैराळ, रावसाहेब गायकवाड, शरद खरात, चंद्रकांत खरात, जयाबाई डोळस, बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अशोक म्हंकाळे, प्रशांत लोखंडे, भाऊसाहेब देव्हारे व प्रथमेश गोतीस यांनी अर्ज घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com