
पाथर्डी: दैत्यनांदूर येथे उभारण्यात आलेल्या सोलर प्रोजेक्टसाठी २० लाख रुपये उकळल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अशोक राधाकिसन दहिफळे (रा. दैत्यनांदूर) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर २ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.