
-राजू नरवडे
संगमनेर : शहरातील पावबाकी रस्त्यावरील लक्ष्मण निवृत्ती जोर्वेकर यांचा गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय तब्बल चार पिढ्यांपासून सुरू आहे. आजही जोर्वेकर कुटुंब परंपरा जपत, आधुनिकतेशी जुळवून घेत, निष्ठेने आणि मनापासून गणपती बाप्पांच्या देखण्या मूर्ती घडवत आहे. त्यांच्या हातातील निपुणता, मूर्तींची सौंदर्यपूर्णता आणि कलात्मकतेमुळे त्यांच्या मूर्तींना केवळ संगमनेरपुरते नव्हे, तर नाशिक व पुण्यासह इतर जिल्ह्यांतही मोठी मागणी असते.