
-विनायक दरंदले
सोनई : दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून सोनई येथील आध्यात्मिक केंद्राने श्रावण महिन्यात रोज नऊ तास व महिन्यांतील एकूण २७० तास महादेव पिंडीवर श्रावण अभिषेक करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय रोज भुपाळी, मध्यान आरती व सायंकाळची सूर्यास्त नैवेद्य आरती व विविध धार्मिक माळजप, जयघोष, औदुंबर प्रदक्षिणा आदी आराधना सेवेकरी करीत आहेत.