
Ahilyanagar Crime
sakal
अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने कर्जतमधील भांडेवाडी येथे छापा टाकून तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. सचिन सोपान झगडे (वय ४२, रा. भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) व स्वप्नील बबन सोनवणे (वय २३, रा. लोणी मसदपूर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपी भाऊसाहेब किसन सकुंडे (रा. मदनवाडी, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.