

Spiritual Atmosphere at Bhagwangad as Baba Accepts ₹31 Lakh Donation
sakal
सोनई : गणेशवाडी (ता. नेवासे) येथील ग्रामस्थांनी मागील वर्षी रामनवमीच्या सोहळ्यात केलेल्या संकल्पाची पूर्ती म्हणून आज गुरुवारी (ता.२६) रोजी सायंकाळी सात वाजता महंत डाॅ. नामदेव महाराज शास्री यांच्याकडे भगवानगड विकासाकरिता रोख एकतीस लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. बाबांनी देणगी स्वीकारताच ''भगवान बाबा की जय'' नामाचा जयघोष करण्यात आला.