कल्याण-नांदेड महामार्गासाठी ३५ कोटींचा निधी - विखे पाटील

35 crore fund for Kalyan-Nanded highway - Vikhe Patil
35 crore fund for Kalyan-Nanded highway - Vikhe Patil

नगर ः जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कल्याण, अहमदनगर, नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 35 कोटी 42 लाखाचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. 
कल्याण व नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे म्हणून मागणी होती. जिल्ह्याच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्राबरोबरच या मार्गावरुन जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रास्थानी येणाऱ्या प्रवासी वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन या महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या रस्त्याच्या कामाच्या दाखल झालेल्या प्रस्तावास मंजुरी मिळून 35 कोटी 42 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. 
या निधीतून कल्याण चौक ते सक्‍कर चौक सहा किलोमीटर, स्टेट बॅकेपासून ते चॉदबेबी महाल दहा किलोमीटर, चॉंदबेबी महाल ते मेहकरी चार किलोमीटर अशा अंतराचे काम टप्प्याटप्पयाने पूर्ण केले जाणार आहे. या मार्गाला निधी उपलब्ध झाल्याने मोठ्या शहरांना जोडणाऱ्या वाहतुकीलाही मोठी मदत होऊन जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही या मार्गामुळे फायदा होईल. या मध्ये प्रामुख्याने नगर शहरातील रेल्वे पुलापासून ते सक्कर चौक या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रेल्वे पूल ते सीनानदी पत्रापर्यंत कॉंक्रिटी गटारच्या कामाचा समावेश करण्यात आले आहे, असे खा. विखे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com