तळेगाव दिघे केंद्राचं "आरोग्य" सुधारणार, मिळाला निधीचा बुस्टर

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरातई सकाळ

संगमनेर ः तालुक्याच्या तळेगाव गटातील ग्रामस्थांच्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून 4 कोटी, 43 लाख, 44 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी दिली. मंत्री थोरात यांनी निधीचा बुस्टर डोस दिल्याने केंद्राचे आरोग्य सुधारणार आहे. (4 crore 50 lakh sanctioned to Talegaon Dighe Health Center)

तळेगाव विभागातील गावे व वाड्यांवरील आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करीता, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत 4 कोटी, 43 लाख, 44 हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे.

बाळासाहेब थोरात
"उजनी'च्या पाण्यावरून पेटणार सोलापूर-इंदापूर नवा वाद?

या निधीतून तळेगाव दिघे येथील जुन्या इमारती शेजारी नवीन प्रशस्त, अद्ययावत इमारत होणार असून, स्वतंत्र वॉर्ड, अतिदक्षता विभाग, पार्किंग व सुशोभिकरण व आधुनिक दर्जाच्या आरोग्य सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.

हा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल तळेगाव दिघे व पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांचे अभिनंदन होत आहे.(4 crore 50 lakh sanctioned to Talegaon Dighe Health Center)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com