esakal | कोरोनामुळे वाढला नगर जिल्ह्याचा टक्का; दहावीचा निकाल ९९.९७ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result

कोरोनामुळे वाढला नगर जिल्ह्याचा टक्का; निकाल ९९.९७ टक्के

sakal_logo
By
टिम ई सकाळ

नगर : कोरोनामुळे (Corona virus) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला असून, त्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.८८, तर मुलांची टक्केवारी ९९ आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. (Corona-increased-SSC-percentage-in-Ahmednagar-district-marathi-news)

विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता होती शिगेला

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. यंदा जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यांतील ७० हजार ५८५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांतील २६ हजार ४८१ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ३० हजार ३६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १३ हजार ११६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ६०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, दुपारी निकाल जाहीर झाला असला, तरी मंडळाची साइट तांत्रिक अडचणीमुळे बंद झाली. सायंकाळपर्यंत साइट सुरळीत न झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची निकालाची उत्सुकता शिगेला पोचली होती.

हेही वाचा: UGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अ‍ॅडमिशन करा

'या' तालुक्यांचा निकाल शंभर टक्के

अकोले, कोपरगाव, नेवासे व श्रीगोंदे या चार तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

तालुकानिहाय निकाल (टक्केवारी) असा :

अकोले : १००, जामखेड : ९९.९५, कर्जत : ९९.८८, कोपरगाव : १०० टक्के, नगर : ९९.९८, नेवासे : १००, पारनेर : ९९.९७, पाथर्डी : ९९.९५, राहाता : ९९.९६, राहुरी : ९९.९५, संगमनेर : ९९.९५, शेवगाव : ९९.९७, श्रीगोंदे : १००, श्रीरामपूर : ९९.९७.

परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेले विद्यार्थी : ७०,५८९

परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी : ७०,५८५

विशेष श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : २६,४८१

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : ३०,३६१

द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : १३,११६

अन्य उत्तीर्ण विद्यार्थी : ६०८

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : ७०,५६६

हेही वाचा: नाशिकच्या शास्त्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी शोधले स्मार्ट तंत्र!

पुनर्परीक्षार्थी

परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी : २५७२

विशेष श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : ३१

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : २०३

द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : ३५२

पास श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी : एक हजार ३९८

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : २५१६

टक्केवारी : ९७.८२

एकूण विद्यार्थी : ४०,५५५

उत्तीर्ण विद्यार्थी : ४०,५९२

टक्केवारी : ९९

अनुत्तीर्ण विद्यार्थी : १३

एकूण विद्यार्थिनी : ३००३०

एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनी : ३००२४

टक्केवारी : ९९.९८

अनुत्तीर्ण विद्यार्थिनी : सहा

(Corona-increased-SSC-percentage-in-Ahmednagar-district-marathi-news)

loading image