अहमदनगर : संगमनेर खुर्द परिसरात ९ लाखांचा गांजा जप्त

ganja
ganjaesakal


संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेर खुर्द परिसरातील एका घरातून, विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ९ लाख ३० हजार ९१० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. १) रात्री सव्वाअकराच्या सुमारास शहर पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, दोघे पसार आहेत.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपींचे पलायन

संगमनेर खुर्द परिसरातील वर्पे वस्तीवरील सीमा राजू पंचारिया हिच्या घरात ९ लाख ३० हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यामध्ये ४६ किलो ४२५ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. छाप्यादरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पलायन केले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विजय पवार यांच्या फिर्यादीवरून सीमा राजू पंचारिया (रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर), राजू चव्हाण (रा. संगमनेर, पूर्ण नाव समजले नाही) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ganja
Nitin Gadkari: "नगरहून जाणार सुरत-चेन्नई महामार्ग"


आरोपी सीमा पंचारियावर याआधीही गांजातस्करीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने आणि पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज शिंदे तपास करीत आहेत.

ganja
Sharad Pawar : "हायड्रोजन गॅस हे पुढचे व्हर्जन"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com