

“Shani Shingnapur employees in tears — 570 workers unpaid before Diwali; demand immediate salary release.”
Sakal
सोनई: शनिशिंगणापूर येथील हंगामी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने संबंधित ५७० कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी परवा बुधवारपासून (ता. ५) उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे. सुरक्षा, स्वच्छता, तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी वर्णी असलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतलेला निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणल्यास दैनंदिन कामकाज व सुरक्षेबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता निर्माण होवू शकते.