esakal | नगर जिल्ह्यात कोरोना बळींनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

नगर जिल्ह्यात कोरोना बळींनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाने (Coronavirus) बुधवारी (ता. १४) नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी (Corona death) पडलेल्यांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सहा हजार सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात नव्या ५३८ रुग्णांची भर पडली आहे. (6000-Corona-deaths-reported-in-Nagar-district-marathi-news)

संगमनेर तालुका पुन्हा एकदा आघाडीवर

जिल्ह्यात आढळून आलेल्या ५३८ रुग्णांपैकी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ७४, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ११७, तर अँटिजेन (Antigen Test) चाचणीत ३४७ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुका रुग्णसंख्येत जिल्ह्यात पुन्हा एकदा आघाडीवर आला आहे. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक ११५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ८६ हजार ४०१ झाली आहे. उपचार सुरू असलेल्यांची संख्या दोन हजार ९७५ झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्या ४२० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ७७ हजार ४१९ रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा: लसीकरणात बाहेर गावच्या लोकांवर अन्याय

तालुकानिहाय रुग्णसंख्या याप्रमाणे

संगमनेर ११५, पारनेर ७८, श्रीगोंदे ५४, पाथर्डी ७१, राहुरी १०, कर्जत ३९, राहाता १७, नगर तालुका २५, नगर शहर २७, नेवासे १२, जामखेड १६, शेवगाव २३, कोपरगाव ११, अकोले २५, श्रीरामपूर ५, भिंगार छावणी परिषदेतील दोन तर बाहेरील जिल्ह्यातील आठ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

(6000-Corona-deaths-reported-in-Nagar-district-marathi-news)

हेही वाचा: एक दिवस येता, पंधरा दिवस फोटो फिरवता; रोहित पवारांवर टीका

loading image