esakal | एक दिवस येता अन् पंधरा दिवस फोटो फिरवता; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar

एक दिवस येता, पंधरा दिवस फोटो फिरवता; रोहित पवारांवर टीका

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (जि.अहमदनगर) : ‘‘जलसंधारणाची कामे राज्यामध्ये झाली आहेत; पण चौकशी फक्त कर्जत तालुक्यातील कामांची सुरू आहे. कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे आता सर्वांना लक्षात आले आहे. ते एक दिवस येतात, फोटोसेशन करतात, तेच फोटो दहा-पंधरा दिवस सोशल मीडियावर टाकतात,’’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केली. (Ram-Shinde-criticizes-MLA-Rohit-Pawar-ahmednagar-political-news)

रोहित पवार उत्तर देण्यास घाबरतात काय?

तालुक्यातील मलठण व दिघी येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर व जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, ‘‘मी विचारलेल्या प्रश्‍नांना आमदार रोहित पवार उत्तर देण्यास घाबरतात काय? मी गेल्या दीड वर्षात अनेक प्रश्न त्यांना विचारले. मात्र, एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला जनतेसाठीच उत्तर देण्याची जबाबदारी त्यांची आहे. पुढील काळात तालुक्यातील जनता झालेली चूक नक्कीच दुरुस्त करतील, अशी मला आशा वाटते.’’ अशोक खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. लहू भिसे यांनी आभार मानले.

हेही वाचा: ‘भाजपला देश चालवता येत नाही; महागाईला केंद्र सरकारच जबाबदार’

त्यांच्या जिरवाजिरवीत राज्याची जिरली

आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात राज्याची जिरली आहे. विकासात राज्य बॅकफूटवर गेले असून, आघाडी सरकार कधी कोसळेल ते सांगता येत नाही. त्यामुळे नेते मंडळी दचकून उठतात, असे शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, अशोक खेडकर, उपसभापती प्रकाश शिंदे, उपसरपंच लहू शिराळे, माजी सरपंच झुंबर भिसे, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भिसे, शिवाजी भिसे आदी उपस्थित होते.

(Ram-Shinde-criticizes-MLA-Rohit-Pawar-ahmednagar-political-news)

हेही वाचा: नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही - मनसे

loading image