esakal | एकुलता एक लेक अन्‌ सुनेचा मृत्यू ; नातवांना शिकवण्यासाठी आजोबांचा संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

A 70 year old grandfather from Padalne is taking care of his grandchildren by doing mercenary work.jpg

येथील सुखदेव तुळशीराम धराडे हे सत्तरीतील आजोबा मोलमजुरी करतात. घरात वृद्ध पत्नी आणि दोन अनाथ नातवंडे आहेत. एका कौलारू घरात ते राहतात. थकलेल्या आजोबांना घर चालवता यंदा दिवाळी करता आली नाही. ना नातवंडांना कपडे, ना गोडधोड ना दिवाळीचा दिवा.

एकुलता एक लेक अन्‌ सुनेचा मृत्यू ; नातवांना शिकवण्यासाठी आजोबांचा संघर्ष

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : पाडाळणेतील ७० वर्षाचे आजोबा मोलमजुरी करून नातवांचा सांभाळ करत आहेत. या नातवांना शिकून मोठ व्हायचं आहे. कोतूळच्या पश्चिमेला आठ किलोमीटरवर पाडाळणे गाव आहे. या गावातील 'कॉलनी' नावाची आदिवासी समाजाची वस्ती आहे. येथील सुखदेव तुळशीराम धराडे हे सत्तरीतील आजोबा मोलमजुरी करतात. घरात वृद्ध पत्नी आणि दोन अनाथ नातवंडे आहेत. एका कौलारू घरात ते राहतात. थकलेल्या आजोबांना घर चालवता यंदा दिवाळी करता आली नाही. ना नातवंडांना कपडे, ना गोडधोड ना दिवाळीचा दिवा.

हे ही वाचा : शेतकऱ्यांच्या कन्येला लग्नानंतर पतीचे प्रोत्साहन; अमेरिकेतील विद्यापीठाची मिळवली प्रथम श्रेणी

सुखदेव धराडे यांची सून एक वर्षांपूर्वी तर मुलाचा सहा महिन्यापूर्वी दुर्धर आजाराने मृत्यू झाला. घरी फक्त १० गुंठे कोरडवाहू जमीन आहे. सून आणि मुलाच्या आजारात रोजंदारीचे पैसे आणि घरातील चीजवस्तू विकल्या. मात्र, सून आणि मुलगा वाचला नाही. त्यांची दोन मुलं विशाल (चौथी) व ऐश्वर्या (दुसरी) आहे. त्यांना सांभाळताना सुखदेव धराडे हतबल झाले आहेत. विशाल आणि ऐश्वर्या यांना शिक्षण घेवून मोठ व्हायचं आहे. आता पोट आणि शिक्षण हे दोन प्रश्न या कुटुंबा समोर आहेत. आता त्यांना कुणी शिक्षण देत का शिक्षण, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

हे ही वाचा : भाजीपाल्याचे दर कोसळले; श्रीरामपूर बाजार समितीत आवक वाढली

ही बातमी समजताच काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते रवी डोंगरे यांनी महसुलमंञी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून सहा महिने पुरेल एवढा किराणा देण्यात आला. रवी डोंगरे यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी देखील मदत करु, असे आश्वासनही या वेळी दिले. रवी डोंगरे हे नेहमी सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात. यापूर्वी ही रवी डोंगरे यांनी अनेक गरजुंना मदत केली असेल, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असेल, असे अनेक उपक्रम रवि डोंगरे मिञ मंडळाच्या वतीने वर्षभर राबविले जातात. या कामात सुनिल डोंगरे, पप्पु औटी, बजरंग शिरोळे, दादासाहेब रोडे, शरदराव मते, संतोष लोढा, सुमित लांडगे, महेश जेधे, अमोल हांडे, जमिर शेख यांची मदत होते.

संपादन : सुस्मिता वडतिले

loading image