
Sangamner police seize ₹9 lakh worth of gutkha; car used by jail-linked accused for transportation.
संगमनेर: गुटखा वाहतूक करणारी कार घारगाव पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रणखांब फाट्यावर पकडली. या कारवाईत दहा लाख रुपयांची कार व आठ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा गुटखा, असा एकूण १८ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात ही कार तुरुंगात असलेला आरोपी युसूफ चौघुले याची असल्याचे उघड झाले आहे.