शेतीअवजारांच्या अनुदानासाठी निघाली ऑनलाइन सोडत

सूर्यकांत नेटके 
Friday, 19 February 2021

शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतीअवजारे, ट्रॅक्‍टरचा लाभ दिला जातो.

अहमदनगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतीअवजारांचा लाभ देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी लाभार्थी निश्‍चित झाले. त्यासाठी ऑनलाइन सोडत काढली. त्यानुसार जिल्ह्यातील 934 शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून शेतीअवजारांसाठी अनुदान मिळणार आहे. मात्र, यंदा तब्बल एक लाख 91 हजार 806 शेतकऱ्यांनी शेतीअवजारांच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. वरिष्ठ पातळीवरच लाभार्थींची निवड होऊन त्यांच्या याद्या थेट जिल्ह्यात पाठविल्या आहेत. निवडलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठविले आहेत. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतीअवजारे, ट्रॅक्‍टरचा लाभ दिला जातो. यंदा प्रथमच 'महाडीबीटी' पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले होते. दरवर्षीच्या तुलनेत सहा महिने उशीर होऊनही यंदा राज्यात 11 लाख 84 हजार 243 अर्ज आले. त्यांत सर्वाधिक एक लाख 91 हजार 806 अर्ज नगर जिल्ह्यातून गेले होते. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर ऑनलाइन सोडत काढून 934 लाभार्थी निश्‍चित केले गेले. त्यांच्या याद्या जिल्हास्तरावर पाठविल्या आहेत. लाभार्थींना तसे मेसेज पाठविले आहेत. 

जामखेड शहरात सुरु आहे स्वच्छतेचा जागर; प्रमुख रस्त्यावर दिले स्वच्छतेचे संदेश

अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत लाभार्थींची संख्या फारच मोजकी आहे. त्यामुळे लाभार्थी निवडीसाठी कोणते निकष लावले, याबाबत पुरेशी माहिती कृषी विभागातून मिळत नसल्याने, संभ्रम कायम आहे. याबाबत सातत्याने विचारणा होत असल्याने, कृषी विभागाची डोकेदुखी वाढली आहे. ऑनलाइन सोडत काढून लाभार्थी निवडल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड तर ई-सकाळचे ऍप

25 ट्रॅक्‍टरसाठी अनुदान 

जिल्ह्यात 56 हजार शेतकऱ्यांनी टॅक्‍ट्ररसाठी अनुदान मिळण्याची मागणी केली होती. त्यापैकी अकोल्यात 13, संगमनेर, नगर, राहाता तालुक्‍यात प्रत्येकी दोन, तर कोपरगाव, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, कर्जत, पारनेरला प्रत्येकी एक ट्रॅक्‍टर मिळणार आहे. 

तालुकानिहाय लाभार्थी (कंसात अर्ज केलेले शेतकरी)
 
कोपरगाव : 42 (11,575) 
राहाता : 41 (7,383) 
अकोले : 71 (8,495) 
संगमनेर : 62 (10,750) 
शेवगाव : 81 (19,520) 
नेवासे : 56 (24,444) 
राहुरी : 64 (9,590) 
श्रीरामपूर : 37 (7,435) 
जामखेड : 36 (8,694) 
श्रीगोंदे : 82 (25,247) 
कर्जत : 90 (20,132) 
पाथर्डी : 70 (16,156) 
पारनेर : 59 (11,563) 
नगर : 61 (10,822) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 934 farmers in the district will get subsidy for agricultural implements from the agriculture department