

Driven by Dreams, Not Convenience: Tribal Children Trek Daily to Attend School
sakal
-शांताराम काळे
अकोले : आमची मराठी शाळा... आमची मराठी शाळा... हे गीत गुणगुणत उन्हाचे चटके सहन करत दररोज पाच किलोमीटरची पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे चित्र अकोले तालुक्यातील दुर्गम भागात पहायला मिळते. शिक्षणाची आस आणि शाळेबद्दलच्या प्रेमाच्या जोरावर ही बालचमू प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आहे.