पुणे जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी श्रीरामपूरात गजाआड | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbers arrested

पुणे जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी श्रीरामपूरात गजाआड

श्रीरामपूर (अहमदनगर) : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पुणे येथील दरोडेखोरांची टोळी शहर पोलिसांनी येथील नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ हत्यारासह व मोटारीसह नुकतीच पकडली. पोलिसांनी दरोडेखोरांकडून एक लाख ८८ हजार रुपांचा ऐवज जप्त केला. असून शहर पोलीस ठाण्यात शनिवार (ता. १३) रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

शहर पोलिस पथकाने शनिवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना ही कारवाई केली. रात्री अडीच वाजेच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला अंधारात काही आरोपी मोटारीसह संशयितरित्या पोलिसांना आढळुन आले.

पोलिसांनी तातडीने (एमएच १४ सीके ९२८८) क्रमांकाची मारुती ओमनी पकडली. त्यातील काही आरोपींना पकडले तर काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळाले. आरोपींकडुन मोबाईलसह रोख रक्कम, धारदार चाकू, ब्लेड, नायलॉन दोरी, लोखंडी कटावणी असा एक लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: शहरातील विकासकामांत तडजोड नाही ; आमदार संग्राम जगताप

दरम्यान, पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस नाईक साईनाथ राशिनकर यांच्या फिर्यादीनुसार महेबुब कुरेशी (वय ४५), तुषार अरुण रोकडे (वय २४), अरबाज कुतुबद्दीन शेख (वय २१), तौफिक हबीब इनामदार (वय ३४), मोबीन रशिद आत्तार, (वय २०, सर्व रा. नारायणगाव परिसर, ता. जुन्नर जि. पुणे) व पसार झालेला समीर शिंदे (रा. जुन्नर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पाच आरोपींनी अटक केली. तर पसार एकाचा शोध सुरु आहे.

हेही वाचा: वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची निदर्शने

loading image
go to top