

Remembering a Leader Who Listened to His Workers
Sakal
-सतीश वैजापूरकर
शिर्डी: मागील वर्षी साईंच्या शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या नियोजनाच्या जबाबदारीत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे सक्रिय होते. अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनाच्या केंद्रस्थानी होते. एका बाजूला तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज, अशी परिस्थिती होती. अशा वातावरणात पक्षाचे पदाधिकारी रमेश गोंदकर आणि संग्राम कोते यांनी आमच्या घरी सदिच्छा भेट द्यावी, असा आग्रह दादांकडे धरला. तो अर्थातच त्यांनी आनंदाने मान्य केला. पहिल्याच दिवशी या दोघांच्याही घरी पुरेसा वेळ देत भेट देखील दिली. आज या पदाधिकाऱ्यांनी दादांच्या या आठवणींना आवर्जून उजाळा दिला.