Ahmednagar : अब्दुल सत्तारांचे वाहन शिवसैनिकांनी अडविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

अब्दुल सत्तारांचे वाहन शिवसैनिकांनी अडविले

मिरजगाव : राज्यात सद्य स्थितीला महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारमधील नेते आघाडीत सर्वकाही अलबेल असल्याचे बोलत आहेत. परंतु, कर्जत तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.

कर्जत येथील विकास कामांच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीतील राज्यमंत्री अब्दुल सत्तार कर्जतकडे जात असताना शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव व युवसेना तालुकाप्रमुख दीपक गांगर्डे यांच्यासह शिवसैनिकांनी सत्तारांचे वाहन अडविले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आमदारांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला डावलले जात असून, कुठल्याही कार्यक्रमात अथवा विकास कामांत विश्वासात घेतले जात नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारींचे निवेदन दिले.

सत्तार यांनी शिवसैनिकांची समजूत काढून वैयक्तिक लक्ष घालू, असे आश्वासन दिले. प्रशांत बुद्धिवंत, महावीर बोरा, सुभाष जाधव, शिवाजी नवले, चंद्रकांत घालमे, अक्षय तोरडमल, बाळासाहेब निंबोरे, अविनाश मते, हरी बाबर उपस्थित होते.

पुढील काळात देखील अशा प्रकारची वागणूक शिवसैनिकांना मिळाली तर कर्जत तालुका शिवसेना भविष्यात आपली ताकद दाखवून देईल.

- बळीराम यादव,

शिवसेना तालुकाप्रमुख

loading image
go to top