श्रीरामपूर : सलग दुसऱ्या वर्षी बेलापूरचा अभिषेक UPSC उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला.
nagar
nagarSakal
Updated on

श्रीरामपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत सलग दुसरया वर्षी बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळ हे उत्तीर्ण झाले आहे. त्यांना मागील वर्षी ६३७ रँक मिळाली होती. त्यानंतर भारतीय रेल्वे खात्यात (INDIAN RAILWAY) अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत असताना, अभिषेक यांनी यंदा पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परिक्षा देवून ४६९ रँक घेतली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. असून त्यात अभिषेक यांनी सलग दुसऱ्या वर्षी घवघवीत यश मिळवले. मागील वर्षी अभिषेक यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले होते. सलग दोनवेळा मिळालेल्या घवघवीत यशासाठी त्यांनी कुठलीही खासगी शिकवणीचा आधार घेतला नसल्याचे सांगितले.

त्यांनी बेलापूर येथील प्राथमिक शाळा व खटोड माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहिती आणि तंत्रज्ञान विभागात अभिषेक यांनी पदवी प्राप्त केली होती. पदवीनंतर आयटी (IT) क्षेत्रातील चांगली नोकरी सोडुन प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला.

nagar
दिल्ली: वकीलाच्या वेशात कोर्टात येऊन गँगस्टरची हत्या

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एम. ए. अर्थशास्त्र विभागासाठी त्यांनी दोन वर्षांपुर्वी प्रवेश घेतला. मागील वर्षी दिल्लीत गेल्यानंतर प्रारंभी खासगी क्लासला लावले, परंतू १५ दिवसांत खासगी क्लासला बाय करुन स्वयं अध्ययनावर भर दिला. गेल्या वर्षी रोज सात तास नियमित अभ्यास करुन अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अधिकारी होण्याचा मान पटकाविला होता. परंतु पहिल्या प्रयत्नात रेल्वे खाते मिळाल्याने अभिषेक यांनी कलेक्टर होण्यासाठी पुन्हा नव्याने तयारी सुरु केली. आणि यंदाही यशाला गवसणी घातली आहे.

अभिषेक यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात झाले, असुन प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कुठलाही अडथळा आला नसल्याचे त्यांनी सांगितले. अभियंता होण्याचे वडिलांचे स्वप्न होते. परंतू पदवीनंतर प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी सुरज थोरात यांची प्रेरणा मिळाली. थोरात हे आयकर विभागात वरिष्ठ अधिकारी असुन त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

nagar
Nagpur : एमबीएचे प्राध्यापक वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य!

तसेच प्राध्यापक व मित्र परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खासगी शिकवणीपेक्षा स्वयं अध्ययनावर भर दिला. अभिषेक यांचे वडील येथील डहाणुकर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक असल्याने त्यांची साथ मिळाली. तर आई संगीता दुधाळ गृहिणी असुन भाऊ प्रणव शिक्षण घेत आहे. सलग दोनवेळा मिळालेल्या यशाबद्दल अभिषेक यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers struggling with increased cost of cultivation in Ahmednagar district
Political Intervention in Akole: MLA Steps In to Stop Illegal Liquor Sales
Police Tighten Net Around Foeticide Network; Fresh Revelations Emerge After Arrest
Blood Ties Broken: Son Confesses to Killing Father in Ahmednagar District
Marathi News Esakal
www.esakal.com