अहमदनगर हादरले; 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

nagar crime
nagar crimeesakal

अहमदनगर : दहा वर्षांच्या मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्या अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसीमधील (MIDC) परिसरात हा प्रकार घडला आहे.

एमआयडीसी परिसरातील धक्कादायक प्रकार

दहा वर्षांची मुलगी साईबनजवळच्या ओसाड माळरानावर शेळ्या चारत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्ती हा तेथे आला. त्याने मुलीसोबत ओळख असल्याचे दर्शवून तिला याच परिसरात असलेल्या ओढ्याकडे घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित मुलीने आरोपी तेथून निघून गेल्यानंतर घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या आईने तिला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेली. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी (ता.10) डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्याद दिली. हा प्रकार (ता. 9) डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एमआयडीसीमधील (MIDC) साईबनजवळच्या ओढ्यात घडला.

nagar crime
Tornado : अमेरिकेत चक्रीवादळाचा कहर; आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू

आरोपीविरोधात तक्रार

एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरूद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 च्या कलम चार, पाच व एम सहानुसार गुन्हा दाखल केला आहे. नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

nagar crime
ऑलिम्पिक चॅम्पियन विरुद्ध पंगा; ती कोर्टात पोहचली, अन् जिंकलीही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com