
शेवगाव: लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी धुळे येथे पाठलाग करुन जेरबंद केले. याप्रकरणी पिडीतेने आण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, जनाबाई प्रल्हाद आंधळे व अनोळखी वाहन चालकाविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात ७ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. शेवगाव पोलीसांचे पथक तेव्हापासून आरोपींच्या मागावर होते. धुळे येथे रविवारी (ता.२७) पहाटे धुळे पोलीसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.