लष्करी जवान असल्याचे सांगत केला गडावर प्रवेश... कायद्याच्या कचाट्यात सापडले 

Action against 12 youths who went to Harishchandragad
Action against 12 youths who went to Harishchandragad
Updated on

अकोले : बंदी असताना हरिश्‍चंद्रगडावर गेलेल्या व वन कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या 12 तरुणांना वन विभाग व कोथळे, पाचनई ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. राजूर पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

अनिल खरात (वय 21), सुदर्शन हांडे (वय 31), हिरामण शेळके (वय 24), संतोष शेळके (वय 21), प्रदीप चौधरी (वय 30, सर्व रा. बोटा), गोकुळ चौधरी (वय 14), सागर चौधरी (वय 18), गणेश वंडेकर (वय 25), विक्रम गायकर (वय 28) व तीन अल्पवयीन मुले (सर्व रा. धामणगाव पाट) काल (सोमवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास मोटरसायकलवरून हरिश्‍चंद्रगडाच्या पायथ्याशी पोचले. तेथे गेटवर त्यांना वन कर्मचाऱ्यांनी हटकले. बंदी असल्याने गडाच्या परिसरात जाता येणार नसल्याचे सांगितले. मात्र, यातील एकाने लष्करातील जवान असल्याचे सांगत दमबाजी करून सर्वांनी गडाच्या परिसरात प्रवेश केला. वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवताच सर्व कर्मचारी, तसेच कोथळे येथील तरुण व पाचनई येथील ग्रामस्थांनी या सर्वांना पकडून वन विभागाच्या वाहनातून मोटरसायकलसह राजूर पोलिस ठाण्यात नेले. 

हरिश्‍चंद्रगड अभयारण्य वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी सांगितले, की 30 जूनपर्यंत वर्षा सहल अथवा अभयारण्यातील गड, किल्ले व निसर्गरम्य ठिकाणी कोणत्याही व्यक्ती अथवा समूहाला जाता येणार नाही, असे वन विभागाने आधीच जाहीर केले आहे. गेल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. अहमदनगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com