
श्रीरामपूर : शहरातील विना नंबर प्लेट व कानठळ्या बसवणाऱ्या मॉडीफाय सायलेन्सर असलेल्या वाहनांवर पोलिसांनी सोमवारी (ता.१) मोहीम राबवून धडाकेबाज कारवाई केली. अनेक वाहनचालक वाहनांना फटाके फोडणारे व कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून शहरातील शांतता भंग करीत होते. त्याचा त्रास वयोवृद्ध नागरिक, महिला व लहान मुलांना सहन करावा लागत होता.