
Executive Committee at Shani Shingnapur Devsthan intensifies action; dismissed trustee finally backs down amid ongoing review.
Sakal
सोनई : महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने बरखास्त केलेले शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त उच्च न्यायालयाच्या ‘जैसे थे’ निकालाने काल रविवारी (ता.५) आक्रमक झाले खरे मात्र आज दानपात्र मोजदाद करणार असल्याची त्यांची प्रतिज्ञा प्रत्यक्षात फोल ठरली. सर्व विभाग प्रमुखांना कार्यकारी समितीसमोर जाण्यास मज्जाव करूनही प्रत्यक्षात आज तीन विभाग प्रमुख वगळता सर्वांनी व्यवस्थापक राजेंद्र वाकचौरे यांच्या दालनात हजेरी लावली आहे. बुधवारी (ता.८) दानपात्राची मोजदाद झाल्यास याचिका दाखल करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला.