बिनशेती नसलेल्या व विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी व्यवसायीकांविरुध्द दंडात्मक कारवाईच्या सुचना

गौरव साळुंके
Friday, 11 December 2020

बेलापूर येथील शेती असलेल्या क्षेत्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी संबधीतावर कारवाई होणार आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील बेलापूर येथील शेती असलेल्या क्षेत्रात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी संबधीतावर कारवाई होणार आहे.

बेलापुर शहरालगत असलेल्या बेलापुर- श्रीरामपुर रस्त्यासमोरील बांधकामास प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट देवून पहाणी केली. यावेळी मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांना संबधीत बांधकामाच्या सुचना दिल्या आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नगर येथील कार्यालयीन बैठक आटोपुन माघारी परतताना प्रांताधिकारी पवार आणि तहसीलदार पाटील यांनी बेलापुरातील शेतीच्या जागेत विनापरवाना असलेल्या बांधकामाची माहिती घेतली. यावेळी मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व कामगार तलाठी कैलास खाडे यांना सुचना देवुन बिनशेती नसलेल्या आणि विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी सबंधीत व्यवसायीकांविरुध्द दंडात्मक कारवाईच्या सुचना दिल्या. 

विनापरवानगी बिनशेती बांधकाम केलेल्या व्यवसायीकांचा शोध घेवुन दंडात्मक कार्यवाहीची नोटीस पाठविणार असल्याचे मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी यांनी सांगीतले. दरम्यान, सदर बांधकाम विनापरवाना असल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापुर्वी स्थानिक प्रशालनाला दिली होती. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against unlicensed construction in Belapur