Gram Panchayat Election : प्रशांत गडाखांमुळे आदर्शगाव मोरया चिंचोरे ग्रामपंचायत बिनविरोध

विनायक दरंदले
Wednesday, 6 January 2021

यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी मोरया चिंचोरे गाव दत्तक घेतले असून, गावात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी भरभरून निधी दिला आहे. प्रतिष्ठानने केलेल्या विकासकामांमुळे या जिरायत भागाचा आर्थिक स्तर उंचावला. युवा नेते उदयन गडाख यांनी गावात एकोपा घडवून आणला.

सोनई (अहमदनगर) : आदर्शगाव मोरया चिंचोरे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत प्रशांत पाटील गडाख यांचा प्रस्ताव मान्य करीत दोन्ही गटांनी सहमती दर्शवली. त्यानुसार गावची निवडणूक बिनविरोध झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी मोरया चिंचोरे गाव दत्तक घेतले असून, गावात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी भरभरून निधी दिला आहे. प्रतिष्ठानने केलेल्या विकासकामांमुळे या जिरायत भागाचा आर्थिक स्तर उंचावला. युवा नेते उदयन गडाख यांनी गावात एकोपा घडवून आणला.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
निवडणुकीत दोन्ही गटांचे प्रत्येकी चार व एक त्रयस्थ उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यासाठी पाच जणांनी अर्ज मागे घेत साथ दिली. बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे प्रतीभा इलग, बाळासाहेब मोरे, पुष्पा कसबे, साहेबराव इलग, लता गाडेकर, भाऊसाहेब मोरे, जयश्री मंचरे, सुनिता कसबे व लता बर्डे. 

याबाबत गडाख म्हणाले, की मागील निवडणुकीत येथे मोठी रणधुमाळी झाली. त्यामुळे मी गावात पाच वर्षे सत्कार स्वीकारला नाही. यंदा गावची निवडणूक बिनविरोध झाल्याने आत्मीय समाधान लाभले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adarshgaon Morya Chinchore Gram Panchayat election has been held without any objection due to Prashant Patil Gadakh