Leopard Threat Alarms Villagers, Administration Urged to Act
Sakal
अहिल्यानगर
MLA Satyajit Tambe: प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी : आमदार सत्यजित तांबे, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे लोक दहशतीखाली..
immediate Action on leopard menace: बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तातडीने कारवाईची आमदार तांबे यांची प्रशासनाला थेट चेतावणी
संगमनेर: मुंबई असो किंवा दिल्ली, मी अनेक आंदोलन केली आहेत. त्यामुळे प्रशासनाला जर थोडीही काळजी नसेल, तर त्यांना जाऊन सांगा. माझा जन्मच आंदोलनातून झाला आहे. बिबट्या गरीब-श्रीमंत पाहून हल्ला करत नाही. तो कुणावरही हल्ला करू शकतो. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की, प्रशासनाने जर तातडीची दखल घेतली नाही, तर येथून एकही नागरिक हलणार नाही, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी बिबट्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला थेट इशारा दिला. बिबट्यांच्या वाढत्या दहशतीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात तांबे आक्रमक झाले.

