परदेशातून आलेल्यांची माहिती प्रशासनाने मागवली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,

नगर : युरोप अथवा इतर देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल, तर ती जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांनी केले. 

भोसले म्हणाले, की ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणीस सुरवात केली. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबादमार्गे येऊ शकतात.

हेही वाचा - नियती किती क्रूर असते बघा

त्यामुळे 25 नोव्हेंबर 2020 पासून परदेश प्रवास करून, अशा प्रकारे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी आवश्‍यक ती दक्षता घ्यावी.

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले असल्याचे डॉ. भोसले म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration sought information from those who came from abroad