
हजारे म्हणाले, सन २०११ च्या रामलिला मैदानावरील आंदोलनात पंतप्रधानांपासून अनेक माझ्या आंदोलनाचे गुणगान गात होते. आता शेतक-यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला.
राळेगण सिद्धी (अहमदनगर) : कॉंग्रेसचे सरकार असताना दिल्लीत मी उपोषण केले, तेव्हा माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतक-यांच्या प्रश्नांबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही, त्याचे उत्तरही दिले जात नाही. आंदोलनाला रामलिला मैदानाला नाकारले जाते. त्यामुळे भाजप नेत्यांचे शेतक-यांच्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडीओ असलेली सीडी तयार करून जनतेला दाखविणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. लावा रे तो व्हिडीओच्या माध्यमातून अण्णा जनजागृती सुरू करणार आहेत.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायतत्ता मिळावी, अशा मागण्यांसाठी हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून ( ता. ३० जानेवारी ) राळेगण सिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात शेवटचे प्राणांतिक उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हजारे म्हणाले, सन २०११ च्या रामलिला मैदानावरील आंदोलनात पंतप्रधानांपासून अनेक माझ्या आंदोलनाचे गुणगान गात होते. आता शेतक-यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडून एकाही पत्राचे उत्तर अजूनही दिले नाही. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी नवी दिल्लीतील रामलिला मैदानावर आंदोलनासाठी चार वेळा पत्रव्यवहार केला, तरीही परवानगी नाकारली. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारला चिंता नसून खोटी आश्वासने देऊन ते शेतक-यांची फसवणूक करीत आहेत.
यांचे आहेत ते व्हिडीओ
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनासह व अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद यांच्यासह नऊ प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ असून ते सोशल मिडीयावर पाठविले जाणार आहेत.