Ahmednagar News : अडीच किलोमीटर रस्त्यासाठी लागली पाच वर्षे

जवळा ते जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा संघर्ष, ठेकेदाराची अनास्था
After five years road work Jamkhed-Karmala state highway has started ahmednagar
After five years road work Jamkhed-Karmala state highway has started ahmednagar Sakal

जामखेड : तब्बल पाच वर्षांनंतर जामखेड - करमाळा राज्यमार्गावरील जवळा ते जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या कामास तब्बल पाच वर्षांनंतर प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नांतून रस्त्याचे काम मार्गी लागले.

जामखेड ते करमाळा राज्यमार्ग ५६ दरम्यान जवळा ते जिल्हा हद्दीपर्यंतचा अडीच किलोमीटरचा रस्ता ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाच वर्षांपासून प्रलंबित होता. २०१९ मध्ये ठेकेदाराने या अडीच किलोमीटर रस्त्याचे काम अर्धवट केले.

कारपेट आणि सिलकोटकडे दुर्लक्ष केले. परिणामी रस्ता ठिकठिकाणी उखडला. वारंवार मागणी करूनही ठेकेदाराने लक्ष दिले नाही. अर्धवट काम असल्याने रस्त्यावरील खड्डे बुजवताना तांत्रिक अडचणी येत होत्या.

हे काम ठेकेदाराकडे असल्याने नव्याने काम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मर्यादा येत होत्या. कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता शशिकांत सुतार, शाखा अभियंता चांगदेव बांगर यांनी मार्ग काढत ठेकेदारावर कारवाई केली. त्याच्याकडील काम काढून घेतले. नव्याने निविदा प्रक्रिया राबवली. रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला असून, महिनाभरात काम पूर्ण होण्याची आशा आहे.

पाच वर्षांपासून प्रलंबित..

२०१८-१९ मध्ये हे काम मंजूर झाले. यासाठी दीड कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. मे. आर. आर. कपूर या ठेकेदाराला प्रत्यक्ष काम चालू करण्यासाठी २० सप्टेंबर २०१९ रोजी कार्यारंभ आदेश निघाला. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर काम पूर्ण करण्याची मुदत बारा महिने होती. दरम्यान, ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही.

जवळा ते जिल्हा हद्दीपर्यंतच्या अडीच किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदाराने पाच वर्षे वारंवार पाठपुरावा करूनही प्रलंबित ठेवले. निविदा शर्तीप्रमाणे ठेकेदारावर कारवाई करून काम काढून घेण्यात आले. नव्याने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू केले आहे.

- शशिकांत सुतार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जामखेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com