esakal | पारनेरच्या आमदारांना थेट शरद पवार यांचा फोन

बोलून बातमी शोधा

पारनेरच्या आमदारांना थेट शरद पवार यांचा फोन
पारनेरच्या आमदारांना थेट शरद पवार यांचा फोन
sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून घरी आल्यानंतर आमदार निलेश लंके यांना फोन केला होता. त्यावेळी ते म्हणाले, निलेश तू कोरोना रूग्णांसाठी मोफत कोविड सेंटर सुरू केले ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. तू स्वतः त्यात जातीने लक्ष देत आहेस. त्या ठिकाणी रुग्णांची अतिशय चांगली व्यवस्था ठेवली आहे असे समजले, हे काम अतिशय चांगले आहे. पण हे करत असताना तू स्वतःचीही काळजी घे ! काही अडचण आली तर मला कळव, असा फोन करून मोठा आधार दिला आहे.

आपल्या आमदार व खासदारांनी आपले एक महिन्याचे मानधन कोरोना विरोधातील लढाई साठी द्यावे. तसेच पक्षाच्या वेल्फेअर मधून एक कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावा, अशा सूचना रूग्णलयातून घरी आल्यानंतर पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांना केल्या आहेत. त्या वेळी त्यांनी आमदार लंके यांना फोन करून त्यांचे कौतुक करत वरील वडिलकीचा सल्लाही दिला. त्यामुळे त्यांना मोठी ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे. अधिक प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली.

हेही वाचा: घोडेश्वरीदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थांचे घरातूनच दर्शन

कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना तालुक्यात मोठी चिंता वाढली आहे. अनेकांचे मृत्यू सुद्धा झाले आहेत. राज्यात ऑक्‍सिजन आणि रेमडीसिव्हरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आमदार लंके यांचे कोरोना काळातील कामाचे राज्यभर कौतुक होत आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेसाठी भाळवणी येथे एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे मोफत उपचार व जेवण सुद्धा दिले जात आहे. या कामाचे कौतुक पवार यांनी सुद्धा केले. रूग्णालयातून घरी आल्यावर त्यांनी लंके यांना फोन करून ते करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले.

फोनवर काय बोलले शरद पवार

निलेश तू कोरोना रूग्णांना मोफत उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू केले, हे कौतुकास्पद आहे. तू स्वतः लक्ष घातले आहे रूग्णांची काळजी घेतोस तेथे चांगल्या मोफत वैद्यकीय सुविधा व जेवणही देत आहेस, हे काम अतिशय चांगले आहे. पण तू जशी रूग्णांची काळजी घेतो तशी स्वतःचीही काळजी घे ! काही लागल्यास मला कळव.