esakal | अहमदनगर जिल्हा परिषदेत बदल्या फक्त नावालाच! कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad

अहमदनगर जिल्हा परिषदेत बदल्या फक्त नावालाच!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नगर : ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत दर वर्षी बदल्या केल्या जात आहेत; परंतु बदली झाल्यानंतर काही कर्मचारी नव्या ठिकाणी जाण्याऐवजी मूळ जागेवरच राहत आहेत. यासाठी अनेकांनी ‘सेवाउपलब्धता’चा आधार घेतला आहे. हा प्रकार थांबवून प्रशासनाने बदली झालेल्यांना सरसकट नियुक्तीच्या ठिकाणी पाठवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. (After transfer Zilla Parishad employees are working in the same place in ahmednagar)

जिल्हा परिषदेतील बदल्यांची प्रक्रिया दर वर्षी पारदर्शक पद्धतीने पार पडते. नगर जिल्हा परिषदेने बदल्यांच्या प्रक्रियेत नेहमीच राज्यात वरचष्मा मिळविलेला आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी कोरोना संकटात नगर जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदल्या करून राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचे अनुकरण राज्यभर करण्यात आले. बदल्यांच्या प्रक्रियेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुक केले आहे; मात्र या कामगिरीवर दर वर्षी होणाऱ्या सेवाउपलब्धतेमुळे पाणी फेरले जात आहे. अनेक कर्मचारी बदली होऊनही मूळ जागी राहण्यासाठी सेवाउपलब्धतेचा वापर करून तेथेच राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून असे काही जण त्याच जागी आहेत.

प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सेवाउपलब्धता रद्द करणे गरजेचे असतानाही, त्याबाबत कुठलीच ठोस कारवाई होत नाही. बदल्या करूनही सेवाउपलब्धतेने मोजके कर्मचारी मूळ जागेवर राहत असतील, तर बदल्यांचा ‘फार्स’ प्रशासन नेमका कशासाठी करते, असा सवाल आता कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सेवाउपलब्धतेचा पडलेला पायंडा प्रशासन या वर्षी तरी थांबवील का, असा थेट सवाल आता कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

(After transfer Zilla Parishad employees are working in the same place in ahmednagar)

हेही वाचा: आमदार-पोलिस निरीक्षकांत खडाजंगी; बैठक सोडून जाण्याची सूचना

loading image