Shrirampur News : जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करणार; श्रीरामपुरात आज सर्वपक्षीय पाणी परिषद

भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी गेल्यानंतर वाड्यावस्त्यांवर प्यायला पाणी राहणार नाही.
After water from Bhandardara dam to Jayakwadi there will no drinking water for near by villages Water Conference today in Srirampur
After water from Bhandardara dam to Jayakwadi there will no drinking water for near by villages Water Conference today in SrirampurSakal

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी गेल्यानंतर वाड्यावस्त्यांवर प्यायला पाणी राहणार नाही. लाभक्षेत्रातील जनतेचा जीवनमरणाचा प्रश्न तयार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पाणी परिषदेचे बुधवारी (ता.११) सकाळी १०.३० वाजता बाजार समिती आवारात शेतकरी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत पाणी सोडण्याबाबत विरोध करण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्तींममुळे क्षीण झालेला लाभक्षेत्रातील शेतकरी पाणी गेल्यास ३ वर्षे उठणार नाही. श्रीरामपूर व आजुबाजूला असलेल्या तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडलेला असताना जायकवाडीला पाणी गेल्यास जानेवारी महिन्यातच पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य भंडारदरा लाभक्षेत्रात जाणवणार आहे. यासाठी ही पाणी परिषद गरजेची आहे.

भंडारदरा व दारणा धरणाचे लाभक्षेत्र हे १०० वर्षांपासून बारमाही पीक पध्दतीचे असताना तेथे ४ ते ५ सिंचन आवर्तनात शेतकरी शेती करतात. मुळा धरणाचे जेमतेम तीन आवर्तने होतात. तरीही तेथील शेतकरी शेती करतात.

परंतु, जायकवाडी लाभक्षेत्रात अशी कुठली शेती पिकवली जाते की त्यांना ७-८ आवर्तने लागतात. केवळ कायदा आपल्या बाजूने आहे. यामुळे पाणी येऊ शकते म्हणून जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी केला. सदर पाणी परिषदेला श्रीरामपूर, राहुरी, राहाता व नेवासे तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे स्वागताध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.

After water from Bhandardara dam to Jayakwadi there will no drinking water for near by villages Water Conference today in Srirampur
Ahmednagar News : सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमिनी मोजणीसाठी आलेले अधिकारी माघारी...

निळवंडे लाभक्षेत्रासाठी आवर्तन सुटणार

१० ऑक्टोबरला निळवंडे लाभक्षेत्रासाठी आवर्तन सुटणार आहे. त्यामुळे भंडारदरा लाभक्षेत्रात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. खंडित पर्जन्यामुळे खरिपाची वाट लागली. आता जायकवाडीला पाणी गेले तर वरील धरणांचे लाभक्षेत्रात रब्बी पिकेही होणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जायकवाडी धरणातून पाण्याचा अपव्यय

जायकवाडी धरणातून साधारण ८५ हजार हेक्टर सिंचन करण्यासाठी जवळपास ४५ हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च केले जाते. परंतु, मुळा धरणातून फक्त २१ हजार दशलक्ष घनफूट पाण्यातून ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होते. हा मोठा पाण्याचा अपव्यय जायकवाडी धरणातून होत असल्याबद्दल ताके यांनी संताप व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com