

Officer Kishor Shinde receiving greetings as his emotional mother sheds tears of joy after his remarkable success
Sakal
चांदे : खडतर परिस्थितीचा सामना करत शिक्षणाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यासाठी मोलमजुरी केली. जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा पास होत आई-वडिलांचे स्वप्न साकार केलेल्या किशोरची ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर चांद्याचे सरपंच रावसाहेब दहातोंडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.